किसान सन्मान निधी योजना 2024 |pm Kisan sanman Nidhi Yojana online application form, labharthi Suchi

Join Our WhatsApp Group!

Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2024: 2018 च्या डिसेंबर एक रोजी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ केला. ही योजना शेतकऱ्यांना फायदा देण्याच्या उद्देशाने काढली गेली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वार्षिक 6000 रुपयांची रक्कम दिली जाते. ती दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये दिली जाते. प्रारंभिक पणे ही योजना दोन हेक्टर जमिनी पारक शेतकऱ्यांसाठी होती .पण आता देशातील सर्व शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा घेऊ शकतात.

आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचे 16 हप्ते पाठवण्यात आलेले आहेत. आत्ताच शेतकऱ्यांनी 16 हप्ता म्हणून 28 फेब्रुवारी 2024 रोजी पैसे प्राप्त केले आहेत. जर तुमच्या खात्यात अजून 16 हफ्त्याचे पैसे आले नसतील तर तुम्ही आपल्या खात्याचा स्टेटस चेक करू शकता .ज्यांची संपूर्ण प्रक्रिया आम्ही या लेखात दिलेली आहे.हे हप्ते दर चार महिन्यानंतर दिले जाते .जी डायरेक्ट बँक ट्रान्सफर (DBT) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा केली जाते .PM kisan योजने मार्फत सरकारद्वारे पूर्ण वर्षांमध्ये 75 कोटी रुपये चे बजेट ठेवले गेले आहे.

या लेखात तुम्हाला आम्ही सांगतो की तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 2024 मधून मिळणाऱ्या रकमेचा लाभ कसा घेऊ शकता .जर तुम्ही अद्याप अर्ज केले नसल्यास आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन अर्जाच्या ऑनलाइन प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती प्रदान करू .या लेखात तुम्ही किसान सन्मान निधी योजनेची माहिती, त्याची उद्दिष्टे, पात्रता,आवश्यक कागदपत्रे याबाबत माहिती प्राप्त करून दिली आहे. तरी तुम्ही हा लेख काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचावा.

kisan samman nidhi
१.योजना- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.
२.कोणी सुरू केली –प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
३. लाभार्थी –देशातील सर्व शेतकरी
4. उद्देश्य- देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता करणे.
5. लाभ –६०००हजार रुपये वार्षिक (तीन समान हप्त्यांमध्ये)
6. वार्षिक बजेट 75000 कोटी रुपये
7. हेल्पलाइन नंबर –०११-२४३००६०६,१५५२६२
8. १६ वा हप्ता-28 फेब्रुवारी 2024
9. प्रक्रिया अर्ज –ऑनलाइन/ ऑफलाइन
10. अधिकारीक वेबसाईट- http://pmkisan.gov.in/


Table of Contents

पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता/pm Kisan 17th installment:-

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननिधी अंतर्गत 16 व्या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँकेत खात्यात जमा केली आहे. आता देशभरातील शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. सरकारने लवकरच त्यांची सूचना देण्याची संभावना आहे.

सतराव्या हप्ता येण्यापूर्वी जर तुम्ही पीएम किसान ची ई-केवायसी करून घेतली नसेल. तर तुम्हाला लवकरच करण्याची गरज आहे. कारण सरकारने पी एम किसान च्या लाभार्थ्यांचा ई-केवायसी (pm Kisan eKYC) अनिवार्य केले आहे. म्हणजे 17 व्या हप्त्याची रक्कम ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यात रक्कम जमा केली जाईल.

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्याचा मुख्य उद्देश देशातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे .जेथे 75% लोक कृषीवर आधारित आहेत. सर्वांना माहीत आहे की शेतकऱ्यांना बहुतेक वेळा नुकसानीचा सामना करावा लागतो. यासाठी सरकारने निर्णय घेतला की देशातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यक रक्कम प्रदान केले जाईल.

पी एम किसान योजनेत आवेदन करण्यासाठी पात्रता (eligibility):-

१.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी भारतीय असणे आवश्यक आहे.
२. लाभार्थी शेतकरी कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये काम करत नसला पाहिजे.
3. दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाच फक्त या योजनेचा लाभ दिला जात होता. पण आता सर्व शेतकरी यासाठी पात्र आहेत.
4. अर्ज करणाऱ्याच्या शेतकऱ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी ई-केवायसी केलेली असणे आवश्यक आहे.

PM किसान योजनेसाठी आवश्यक दस्तऐवज:-

१. आधारकार्ड
2. ओळखपत्र
3. वोटर आयडी, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स
4. मोबाईल नंबर
5. जमिनीचे कागदपत्र
6. बँकेच्या पासबुक
7. पासपोर्ट साईज फोटो

पीएम किसान सन्मान निधी योजना 2024 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

१. सर्वप्रथम तुम्हाला PM-KISAN योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट http://pmkisan.gov.in/ ला व्हिजिट करायचा आहे.
2. या वेबसाईटवर तुम्हाला farmers corner च्या अंतर्गत new farmer registration चा ऑप्शन दिसेल तेथे click करायच आहे.
3. यानंतर तुमच्यासमोर एक न्यू फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.येथे तुम्हाला किसान पंजीकरण साठी शहरी किंवा ग्रामीण क्षेत्राचा ऑप्शन दिसेल.
4. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर व मोबाईल नंबर लिहून राज्य निवडायचा आहे.
5. नंतर तिथे दिलेला कॅपचा कोड भरून सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे.
6. आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल जो तुम्हाला OTP बॉक्समध्ये भरून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
7. नंतर पुढच्या पेजवर तुम्हाला काही व्यक्तिगत माहिती भरून तसेच जमिनीचे विवरण भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
अशाप्रकारे तुमचा ऑनलाईन अर्ज भरून होईल.

किसान सन्मान निधी साठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा:-

देशातील जे शेतकरी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी समक्ष नाहीत. ते ऑफलाइन अर्ज सुद्धा करू शकतात. यासाठी तुम्हाला एक अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा लागेल. तुम्हाला हा फॉर्म भरून जवळच्या जनसेवा केंद्रात जमा करायचा आहे . जनसेवा केंद्राद्वारे तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाईल.

पी एम किसान सन्मान निधी बेनिफिशियल लिस्ट कशी बघायची

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान निधी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे ते शेतकरी पी एम किसान बेनिफिशियल लिस्ट चेक करू शकतात. जर तुम्हाला तुमचे नाव यादीत आलेले पाहायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा.

Pm Kisan beneficiary list चेक करण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.
या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर beneficiary list या ऑप्शन वरती क्लिक करा.
आता तुम्ही एका नवीन पेजवर याल इथे इथे राज्य जिल्हा ब्लॉक गाव इत्यादी ची माहिती भरायची आहे.
सर्व माहिती भरल्यानंतर get report हा ऑप्शन निवडायचा आहे.
हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती किसान सन्मान निधी योजना बेनिफिशियरी लिस्ट ओपन होईल.

पी एम किसान योजना ई केवायसी करण्याची प्रक्रिया

पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम किसान ही केवायसी करणे बंधनकारक आहे याशिवाय आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. यासाठी काळजीपूर्वक आम्ही लिहिलेला लेख खालील वाचायचा आहे.

पी एम किसान इ केवायसी काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला ekyc हा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे.
ही केवायसी वर क्लिक केल्यानंतर तुम्ही एका नवीन पेज वरती याल.
या पेज वरती तुम्ही तुमचा आधार नंबर देऊन सर्च बटन वरती क्लिक करायचं आहे.
आता तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल जो तुम्ही ओटीपी बॉक्स मध्ये भरायचा आहे.
त्यानंतर सबमिट बटन वरची क्लिक करायचं आहे.
अशाप्रकारे तुम्ही पीएम किसान योजना ही केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे.

किसान सन्मान निधी योजना बेनिफिशियरी स्टेटस कसा चेक करायचा

किसान सन्माननिधी बेनिफिशियरी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे.
या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला beneficiary status हा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे.
याच्या पुढच्या पेज वरती तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस पाहण्यासाठी मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर चा ऑप्शन मिळेल.
इथे तुम्हाला मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर भरून कॅपचा कोड भरायचा आहे.
यानंतर get data या बटणावरती क्लिक करायचं आहे.
अशाप्रकारे तुमच्या समोर बेनिफिशियरी स्टेटस ओपन होऊन आलेला आहे.

FAQ:-

१. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी हेल्पलाइन नंबर काय आहे?

->011-24300606,155261

२. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता किती महिन्यातून येतो?

-> ४ महिन्यातून

३. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीत वार्षिक किती रक्कम दिले जाते?

->६००० रुपये.

अन्य योजना पहा :-

प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2024

पीएम विश्वकर्मा योजना

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४

बियाणे अनुदान योजना 2024



Leave a Comment