पीएम विश्वकर्मा योजना 2024 | PM Vishwakarma Yojana Online Application Form

Join Our WhatsApp Group!

केंद्र सरकार द्वारा विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली गेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी याची मुहूर्तमेड रोवली .प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 2023 मध्ये विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली होती. पीएम विश्वकर्मा योजना आजच्या दिवशी एक महत्त्वपूर्ण नाव बनलेला आहे . पीएम विश्वकर्मा योजनेला राष्ट्रीय स्तरावर व्यापक रूपाने अमलात आणलं गेलेला आहे. या योजनेत त्या लोकांना मदत केली जाते जे लोक सीमित साधनांमध्ये कार्य करत आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेत प्रामुख्याने शिल्पकार मूर्तिकार आणि अन्य कलाकार समाविष्ट आहेत. जे आपल्या हात कौशल्याने छोट्या स्तरावर काम करतात. या योजनेमुळे विश्वकर्मा समुदायाच्या लोकांच्या जीवनात सुधार होत आहे आणि सोबतच देशाच्या आर्थिक विकासात प्रगती होत आहे. जे व्यक्ती आर्थिक कारणांमुळे आपले पारंपरिक उद्योग सोडून इतर रोजगार करत आहेत त्यांच्या पारंपारिक व्यवसायास जिवंत ठेवण्यास या योजनेमुळे मदत होते. त्या लोकांचा पारंपरिक व्यवसाय जिवंत ठेवून त्यांची वृद्धी करण्याचा प्रयत्न सरकार या योजनेमार्फत करत आहे. या योजनेचा लाभ 18 पेक्षा जास्त व्यवसायांना होत आहे

पीएम विश्वकर्मा योजना काय आहे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 1 फेब्रुवारी 2023 ला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि ट्रेनिंग दिला जातो सोबतच त्यांना प्रशिक्षणादरम्यान पाचशे रुपये ची रक्कम दिली जाते. याशिवाय सरकार विविध प्रकारचे टूलकिट विकत घेण्यासाठी 15000 रुपयाची रक्कम बँकेत ट्रान्सफर करेल तसेच फ्री ट्रेनिंग दिली जाते व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून मात्र 5% व्याजावर तीन लाख रुपये पर्यंत रक्कम कर्ज म्हणून भेटते. ही रक्कम दोन हप्त्यात दिली जाते. पहिला हप्ता एक लाख रुपये आणि दुसरा हप्ता दोन लाख रुपये दिला जातो.

pm vishwakarma yojana overview

योजनेचे नावप्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024
लाभार्थी विश्वकर्मा समुदायाच्या सर्व जाती
अर्ज प्रक्रियाऑनलाइन /ऑफलाइन
उद्देश्य फ्री मध्ये स्किल ट्रेनिंग व रोजगारासाठी लोन देणे
अर्ज कोणी करावा शिल्पकार किंवा कारीगर
बजेट 13000 कोटी

पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश

बहुतेक जाती आर्थिक योजनांपासून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहतात. तसेच त्यांना योग्य प्रशिक्षणही भेटत नाही. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश आहे विश्वकर्मा समुदायाच्या सर्व जातींना त्यांच्या कौशल्य विकासासाठी योग्य प्रशिक्षण देणे व कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणे. ज्या लोकांकडे कौशल्य आहे पण त्याच्याकडे प्रशिक्षणासाठी पैसे नाहीत त्यांना सरकार प्रशिक्षण व आर्थिक सहाय्यता प्रदान करते.

पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभ आणि वैशिष्ट्ये

ज्या जाती विश्वकर्मा समुदायात सामील आहेत. त्या सर्व जातींना योजनेचा लाभ भेटेल या योजनेअंतर्गत 18 प्रकारचे व्यवसायांना कर्ज दिले जाते. सरकारने या योजनेसाठी 13000 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. या योजनेअंतर्गत फक्त शिल्पकार आणि कार्यक्रम व आयडी कार्ड प्रदान केले जाईल. या योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा समुदायाच्या जातींना ट्रेनिंग दिली जाते आणि आर्थिक सहाय्यता दिली जाते जिथून ते आपला रोजगार मिळू शकतात या योजनेअंतर्गत विश्वकर्मा समुदायास कमी व्याजावर कर्ज मिळवून दिले जाते. यातून ते लोक स्वतःचा पारंपारिक व्यवसाय जिवंत ठेवू शकतात आणि स्वतःच्या व देशाच्या विकासात हातभार लावू शकतात. या योजनेअंतर्गत तीन लाखाचे कर्ज पाच टक्के व्याजदरावर दिले जाते. जे दोन हप्त्यात दिले जाते प्रथम हप्ता एक लाख व दुसरा हप्ता दोन लाखाचा भेटतो.

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला भेटेल

  • लोहार
  • सोनार
  • चप्पल दुरुस्त करणारे
  • न्हावी
  • धोबी
  • शिंपी
  • कुंभार
  • मूर्तिकार
  • कारपेंटर
  • मालाकार
  • राज मिस्त्री
  • नाव बनवणारे
  • अस्त्र बनवणारे
  • कुलूप बनवणारे
  • माशांचे जाळे बनवणारे
  • हाथोडा आणि टूलकिट बनवणारे
  • चटई ,झाडू बनवणारे
  • खेळणी बनवणारे

पीएम विश्वकर्मा योजनेची पात्रता

  • या योजनेच्या अंतर्गत विश्वकर्मा समुदायाच्या 140 पेक्षा जास्त जातीपात्र आहेत.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीजवळ जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकांनाच भेटणार
  • अर्ज करणारा व्यक्ती कुशल कारागीर किंवा शिल्पकार असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत अर्ज करण्यासाठी दस्तऐवज

  • चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी
  • आयु 18 वर्षे पेक्षा जास्त असली पाहिजे
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड व पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • बँक अकाउंट पासबुक
  • ओळखपत्र

पीएम विश्वकर्मा योजनेत ऑनलाईन अर्ज कसा करायचा

  • सर्वप्रथम विश्वकर्मा योजनेच्या अधिकारी वेबसाईटला व्हिजिट करा.
  • या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी Apply बटन दिसेल तिथे क्लिक करा.
  • यानंतर आपल्या युजर आयडी आणि पासवर्ड चा उपयोग करून सीएससी पोर्टलवर लॉगिन करा.
  • तिथे या योजनेत अर्ज करण्यासाठी एप्लीकेशन फॉर्म समोर उघडेल.
  • सर्वप्रथम तुम्हाला आपला मोबाईल नंबर आणि आधार नंबर एंटर करून ॲप्लिकेशन फॉर्म ला व्हेरिफाय करायचा आहे. त्यानंतर स्क्रीनवर जैनस्ट्रक्शन दिले आहेत त्यानुसार अर्ज फॉर्म भरायचा आहे.
  • काही आवश्यक दस्ताऐवजांची कॉपी स्कॅन करून तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याचा ऑप्शन दिसेल . त्यावर क्लिक करून आपल्या सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • यानंतर या सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला विश्वकर्मा डिजिटल आयडी भेटेल जो तुम्हाला अर्ज करण्यासाठी उपयोगी पडेल.
  • यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करून आपण ज्या मोबाईल नंबर चा वापर करून रजिस्टर केला आहे. त्या मोबाईलचा वापर करून लॉगिन करून घ्यायचा आहे.
  • यानंतर तुमच्या पुढे योजनेसाठी अर्ज करण्याचा मुख्य एप्लीकेशन फॉर्म उघडेल याच्यात विविध प्रकारची माहिती भरून तुम्ही अर्ज करू शकता.

पीएम विश्वकर्मा महाराजाची स्थिती कशी चेक करायची

  • विश्वकर्मा योजनेचा अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी तुम्ही विश्वकर्मा योजनेचे अधिकारी वेबसाईटवर जायचं आहे.
  • इथे तुम्हाला एक होमपेज दिसेल होम पेज वरती विश्वकर्मा श्रम सन्मान योजने संबंधित ऑप्शन दिसेल .
  • तुम्हाला यात योजना की स्थिती वाल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे .
  • इथे तुम्ही आपला अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

FAQ

१.पीएम विश्वकर्मा योजनेची सुरुवात कोणी केली?

->केंद्र सरकार

२. पीएम विश्वकर्मा योजना ची सुरुवात कधी केली?

-> १ फेब्रुवारी 2023

३. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला होतो?

-> कारीगर आणि शिल्पकार





Leave a Comment