pradhan mantri suryoday yojana 2024(प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४)(काय आहे, कधी सुरू होणार, लाभ, लाभार्थी, ऑनलाइन रजिस्ट्रेशन, अनुदान राशी, पात्रता, दस्तऐवज, सबसिडी)(pm suryoday Yojana benefits, beneficiary, online apply, offline registration, official website, helpline number, list, how to apply, status, registration, eligibility, documents, form PDF, latest news ,subsidy)
Pm suryoday Yojana:-
22 मे 2024 दिवशी ज्यावेळेस संपूर्ण देश आपापल्या घरात व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहित इतर व्हीआयपी लोक आयोध्या मध्ये राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम साजरा करत होते . तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत होते. कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर त्यांनी या योजनेची घोषणा केली . या योजनेचा नाव ठेवलं गेलं प्रधानमंत्री सूर्योदय योजना . ही योजना भारत देशात सोलर एनर्जीचा वापर वाढवून सोलर एनर्जी ला प्रोत्साहन देण्यासाठी चालू केली आहे . याचा लाभ देशातील सामान्य लोकांना होईल. – चला या योजनेविषयी संपूर्ण माहिती घेऊया.
Pradhanmantri suryoday Yojana 2024:-
योजनेचे नाव | प्रधानमंत्री सूर्योदय योजना |
कोणी सुरू केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी |
लाभार्थ्यांची संख्या | एक कोटी |
लाभार्थी यादी | अजून जाहीर केली नाही |
उद्देश्य | सोलार रूफ टॉप प्रदान करणे |
अधिकारी वेबसाईट | www.pmsuryaghar.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 15555 |
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे उद्देश्य व विशेषता:-
आपल्या देशात किमान सहा ते आठ महिने कडक ऊन असते. अशात भारत सरकार सतत प्रयत्न करत आहे की सबसिडी द्वारे देशात मोफत सोलर सिस्टीम देण्यात येईल.
अशात ग्रामीण भागातील सामान्य लोकांचा वीज बिलावरील खर्च कमी करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा मोठा फायदा होईल. या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी लाभार्थ्यांना रूफटॉप सोलर पॅनल देण्यात येतील.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा मुख्य उद्देश भारतीय ग्रामीण भागातील लोकांना मोफत सोलर प्रणाली तंत्रज्ञान देणे आणि त्यांना विजेच्या मागणीमुक्त अनुभवाच्या लाभास येण्यास पुढील चरणात आणण्याचा प्रयत्न करणे आहे. या योजनेमध्ये ग्रामीण क्षेत्रातील लोकांना रूफ टॉप सोलार पॅनल्स मोफत दिले जातात ज्यामुळे त्यांच्यावरील वीज बिलाचा ताण कमी होतो. व त्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनामध्ये विकासाला चालना भेटते. त्यांचे राहणीमान सुधारते. व सोबतच देशाच्या विकासालाही चालना भेटते. या योजनेचा फायदा फक्त गरिबांना नाही तर वातावरणाला सुद्धा आहे. सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पारंपारिक ऊर्जा स्रोतांना प्राधान्यता भेटते. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. तसेच ग्रीन हाऊस इफेक्ट ला आळा घालण्यात पाऊल उचलले जाते.
प्रधानमंत्री सूर्योदय योजना पात्रता (eligibility):-
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारताचे नागरिकत्व आवश्यक आहे.
- सूर्योदय योजनेत गरीब व मध्यमवर्ग यांना प्राधान्य असेल.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असले पाहिजे.
- आवेदकाजवळ स्वतःच्या मालकीचे घर असणे आवश्यक आहे.
- तसेच यापूर्वी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या अशा कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी दस्ताऐवज/डॉक्युमेंट्स:-
- घरातील प्रमुख व्यक्तीचे आधार कार्ड
- राशन कार्ड झेरॉक्स
- बँक डिटेल्स
- मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो
- घराचे दस्तऐवज
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला (दोन लाखाच्या आतील)
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा? (Pradhanmantri suryoday Yojana registration):-
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेत अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स काळजीपूर्वक वाचा.
Step 1 सर्वप्रथम pmsuryaghar.gov.in या अधिकारीक वेबसाईटला व्हिजिट करा.
Step 2. वेबसाईट वरती आल्यानंतर quick links च्या सेक्शन मध्ये solar rooftop apply online हा पर्याय निवडावा.
Step 3. आता तुमच्या स्क्रीन वरती suryoday Yojana online registration form दाखवेल. जिथे तुम्हाला आपले राज्य, जिल्हा, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हायडर चे नाव आणि कंजूमर नंबर लिहून रजिस्ट्रेशन करायचे आहे.
Step 4. आता तुम्हाला मोबाईल नंबर च्या मदतीने पोर्टलवर लॉग इन करायचे आहे.
Step 5. लॉग इन केल्यानंतर तुमच्या स्क्रीन वरती एप्लीकेशन फॉर्म दाखवेल. एप्लीकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हायडर कडून मंजुरी मिळेल.
Step 6. मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीच्या डीलर कडून रूफटॉप सोलर पॅनल इंस्टॉल करावा लागेल.
Step 7. यानंतर तुम्हाला नेट मीटर साठी अप्लाय करायचे आहे.
Step 8. इन्स्पेक्शन नंतर discom द्वारा commissioning certificate दिला जाईल.
Step 9 आता तुम्हाला या सर्टिफिकेट सोबत एक कॅन्सल चेक आणि बँक डिटेल पोर्टलवर अपलोड करायचे आहे.
अशाप्रकारे प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज भरला जाईल.
FAQ
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेत किती सबसिडी दिली जाते ?
प्रति किलो वॅट तीस हजार रुपयांची सबसिडी दिली जाते
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा हेल्पलाइन नंबर काय आहे ?
15555
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ किती लोकांना होईल ?
एक कोटी
अन्य योजना पहा :-