Biyane anudan Yojana:-
‘नमस्कार शेतकरी बंधूंनो ‘
खरीप आणि रब्बी हंगामासाठी महाराष्ट्र सरकार मोफत बियाणे देत आहे. या योजनेचे नाव आहे mahadbt Biyane anudan Yojana. खरीप हंगामासाठी जूनमध्ये तर रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर च्या दरम्यान बियाणे वाटप केले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी बियाणे वाटपाच्या एक महिना अगोदर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते.
महाडीबीटी (mahadbt) पोर्टल योजना 2024 : केंद्र शासन राष्ट्रीय सुरक्षा अभियाना अंतर्गत समाविष्ट जिल्हे आणि पिके:-
भरड धान्य -(मका )- | औरंगाबाद, सांगली ,जालना, नाशिक, धुळे, जळगाव. |
गहू – | सोलापूर ,बीड ,नागपूर. |
भात- | नाशिक, पुणे ,सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. |
कडधान्य- | सर्व जिल्हे. |
बाजरी – | नाशिक, धुळे, जळगाव ,अहमदनगर ,पुणे, सातारा ,सांगली ,औरंगाबा, बीड ,जालना ,उस्मानाबाद. |
ज्वारी – | नाशिक, धुळे, नंदुरबार ,जळगाव, अहमदनगर ,पुणे ,सोलापूर, सातारा, लातूर ,उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी ,हिंगोली, बुलढाणा, अकोला. |
ऊस- | औरंगाबाद ,जालना, बीड. |
कापूस – | बुलढाणा, अकोला ,यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर. |
महाडीबीटी बियाणे योजनेसाठी पात्रता:-
१.स्वतःच्या नावावर जमीन व ७/१२ व 8 अ उतारा पाहिजे.
२. वरील कोणत्याही पिकासाठी अर्ज करत असेल तर तो शेतकरी त्या जिल्ह्यातील असला पाहिजे.
- तसेच तो शेतकरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा असला पाहिजे.
महाडीबीटी बियाणे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-
१. ७/१२ प्रमाणपत्र
२. ८- अ प्रमाणपत्र
३. पूर्वसंमती पत्र
४. हमीपत्र
५. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लाभार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र.
बियाणे अनुदान योजना उद्देश्य
बियाण्यांचा योजना ही योजना भारत सरकारने चालू केली आहे. बियाणे अनुदान योजना ही खास शेतकऱ्यांसाठी तयार केलेली योजना आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्याला सरकारकडून मोफत बियाणे देण्यात येत आहे. या योजनेमध्ये सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येते. हे बियाणे सर्व प्रक्रियेतून केलेले असते. त्यामुळे शेतकऱ्याला पिकामध्ये वाढ दिसून येते. व उत्पन्नातही वाढ होते. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असली पाहिजे. आपण पाहतो की सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिके घेतले जातात. तर कोणता शेतकरी पिकासाठी अर्ज करत असेल तर तो त्या जिल्ह्यातील असला पाहिजे. व तो अनुसूचित जमाती व जातीचा असला पाहिजे. बियाणे अनुदान योजना यामध्ये शेतकऱ्याचा कसा आणि किती फायदा होईल हे पाहिले आहे. आपल्याला जर या योजनेचा लाभ व बियाणे मिळवायचे असेल तर एक महिना आधी अर्ज भरावा लागतो. व नंतर तो आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपल्या बियाणे घेऊ शकता. आत्ताच्या काळामध्ये शेतकऱ्याचे खूप नुकसान होत आहे पाऊस न आल्यामुळे किंवा अति पाऊस झाल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्याला एक मदतीचा हात म्हणून सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. बियाणे अनुदान योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात.
बियाणे अनुदान योजनेची गरज
आपण पाहतो की शेतकरी त्याच्या शेतामध्ये किती कष्ट करतो आणि त्याला त्याची किंमत सुद्धा जास्त भेटत नाही त्यामुळे तो त्या पिकांमध्ये फायदा मिळवू शकत नाही. त्यामुळे तो पिकासाठी येणार खर्च काढू शकत नाही. बियाणे अनुदान योजनाद्वारे अशा शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटून सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे. आताच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकाला भाऊ नाही परंतु त्याला लागणारे खाद्य व बियाणे याची किंमत गगनाला भिडली आहे. अशा काळात तो शेतकरी दुसरीकडे कुठेतरी कामाला जाईल किंवा आत्महत्या तरी करेल. व तो पीक घेणार नाही व शेती करणार नाही. हे सर्व थांबवण्यासाठी सरकारने बियाणे अनुदान योजना 2024 चालू केली आहे. या योजनेची गरज सध्याच्या काळात खूप आहे. व बाजारात भेटणारे कोणत्याही बियाणामध्ये नंतर पिकाला रोगराई जास्त पसरते परंतु बियाणे अनुदान योजनेमध्ये वापरले जाणारे बियाणे हे सर्व प्रक्रिया करून आणलेले असतात. त्यामुळे या बियाणांवर रोग लागण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे फवारणीचा खर्च हे वाचून जातो. व एकही जास्त प्रमाणात येते. बियाणे अनुदान योजना ही एक काळाची गरज आहे.
योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसे करायचे?
- बियाणे अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mahaDBT portal (महाडीबीटी पोर्टल ) ला व्हिजिट करायचे आहे. इथे तुमची प्रोफाइल बनवायचे आहे.
- प्रोफाइल बनवते वेळी तुमचे नाव ,पॅन कार्ड ,आधार कार्ड, बँक पासबुक ,हे सर्व कागदपत्रे तसेच जमिनीचे उतारे व आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असते.
- प्रोफाइल बनवून झाल्यानंतर अर्ज करा हा ऑप्शन निवडायचा.
- नंतर तुम्हाला बियाणे अनुदान योजना हा ऑप्शन दिसेल.
- नंतर तुम्हाला कोणत्या व किती पिकांसाठी अनुदान हवं आहे ते निवडायचं आहे.
- एकदा अर्ज भरल्यानंतर काही दिवसात तुम्हाला पॅकिंग पिशव्या ग्रामपंचायत मध्ये भेटतील.
१.बियाणे अनुदान योजनेची अंतिम तारीख कधी आहे?
-> ३१ मे
२.बियाणे अनुदान योजनेचे बियाणे कुठून घ्यायचे?
-> आपल्या गावातील ग्रामपंचायत मधून.
३. कोणत्या हंगामात महाराष्ट्र सरकार मोफत बियाणे देत आहे?
-> खरीप आणि रब्बी हंगामामध्ये
अन्य योजना पहा :-
प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2024